_देवानंद लुडबे व अरविंद मोंडकर यांनी राजाराम देशमुख यांची घेतली भेट….
*💫मालवण दि.०५-:* सिद्धीविनायक मंदिरचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची मुंबई येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी काही मदत लागल्यास मला सांगा, मी देईन, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. यावेळी महेश तेली, रुषाल पाटील आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे मंदिर ट्रस्टच्यावतीने राज्यभरात मदत केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गरजू नागरिकांना मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क करा व त्या बाबत जिल्ह्यातील नागरिकांना सहकार्य करू असेया भेटी दरम्यान सांगितले. मदत हवी असल्यास प्रवक्ता अरविंद मोंडकर- ९८९२०५५८२० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
