*संपर्कातील विद्यार्थ्यांची देखील करण्यात आली तपासणी; सायंकाळी प्राप्त होणार अहवाल*
*💫सावंतवाडी दि.०४-:* शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोना ची लागण झाली आहे. संबंधित विद्यार्थिनी ही एका गावातून शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होती. खबरदारी म्हणून तिच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल सायंकाळ पर्यंत प्राप्त होणार आहे.
