⚡कणकवली ता.१३-: आज देशातील प्रत्येक घरी तीन दिवस भारताचा झेंडा फडकत असल्याने याचा अभिमान प्रत्येकाला आहे. याचमुळे आपला देश विविधतेत एकता निर्माण करीत आहे.असे प्रतिपादन कासार्डेचे सुपूत्र तथा वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यानी केले.
ग्रामपंचायत कासार्डेच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनाच्या माझी माती, माझा देश उपक्रमाचा प्रारंभ मातीचा दिवा हाती धरून ‘पंचप्राण शपथ’ ,वसुधा वंदन, वीरों का वंदन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी सैनिक रविंद्र पाताडे याच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिलाफलक अनावरण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, सरपंच निशा नकाशे,उपसरपंच गणेश पाताडे,माजी सरपंच संतोष पारकर,तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पाताडे,पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर, माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, रविंद्र पाताडे,उद्योजक नामदेव बांदिवडेकर, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे,कार्याध्यक्ष संजय पाताडे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते,माहिती अधिकारी तालुका प्रचार प्रमुख गणेश पेडणेकर, श्रीरंग पाताडे, पत्रकार सचिन राणे, गुरूप्रसाद सावंत, कोतवाल दिपक आरेकर, सहदेव म्हस्के,दत्ताराम शेलार, दयानंद पाताडे, जगन्नाथ पाताडे, भाई पाताडे, राजू कपाळे,ग्रा.पं. सदस्य,आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सर्व शाळा मुख्याध्यापक पवार सर,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, सिआरपी, बचतगट प्रमुख, आरोग्य सेवक,सेविका कृषी सहाय्यक,विद्यार्थी उपस्थित होते
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत असे मान्यवरांकडून सांगत कासार्डे गावातील माजी सैनिक, वीर पत्नी, कुटुंबिक याचे विशेष सत्कार करण्यात आले.
तसेच मान्यवरांच्या हस्ते कासार्डे गावातील मातीचा कलश तसेच वसुधा वंदन उपक्रमांतर्गत कासार्डे स्वयंभू मंदिर परिसरात ७५ वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी माजी सैनिक रविंद्र पाताडे, संजय देसाई, संजय पाताडे प्रकाश तिर्लोटकर, सुहास पाताडे यानी मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
