जगन्नाथ गुरव यांनी फडकवला ध्वज..
वैभववाडी प्रतिनिधी
स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक शासकीय कार्यालयात ३ दिवस ध्वजारोहन होणार असून आज पहिल्या दिवशी नावळे ग्रामपंचायत मध्ये 30 वर्षे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ गुरव यांना ध्वजारोहनाचा बहुमान सरपंच सोनल गुरव यांनी दिला.
यावेळी सदस्य संजय शेळके, रश्मी गुरव, पल्लवी गुरव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गुरव, ग्रामसेवक अनिल घुगे,माजी सरपंच सुवर्णा राणे, सुवर्णा गुरव,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव,प्राची रावराणे,साक्षी गुरव
विद्या मंदिर नावळे धनगरवाडा मुख्याध्यापक भरडकर,माने सर अंनत चव्हाण सर, महाले सर , कर्मचारी वृन्द, आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.
