काळोखातच आंबोली पोलिसांनी सर्वांना काढले सुखरूप बाहेर:शुक्रवारी रात्री आंबोली घाटात घडली घटना
आंबोली,ता.१२: आंबोली घाटात दरडीच्या वळणाच्या जवळ शुक्रवारी रात्री दरीत कोसळली कार झाडाला लटकल्याने आतील प्रवासी बचावले. दरम्यान त्यांनी १०० नंबर वर फोन करून माहिती दिल्यानंतर येथील पोलीस हवालदार दत्ता देसाई व कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी त्याठिकाणी जाऊन घाटात खाली अडकलेल्या ५ प्रवाशांना वर आणले.
रात्रीच्या वेळी काळोखात प्रवासी अडकले असताना पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करीत आंबोलीत आणले. याबाबत त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
