गगनबावडा येथे लक्झरी दरडीवर आढळून तीन प्रवासी गंभीर…

जखमीना कोल्हापूर येथे उपचारासाठी केले दाखल:
वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल..

वैभववाडी प्रतिनिधी
करूळ घाटाच्या सुरुवातीला गगनबावडा हद्दीत लक्झरी बस दरडीवर आढळून झालेल्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच गगनबावडा आणि वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित प्रवाशांना एसटी बसने गोवा येथे पाठविले आहे. ही बस पुणे ते गोव्याला जात होती. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

जखमींमध्ये शिल्पा महेंद्र अनाधन 44, गीता राजेंद्र अनाधन, 50 पिंकल नितीन 35 सर्व राहणार सुरत गुजरात येथील रहिवाशी असून गोवा येथे फिरायला जात होती. पुणे ते गोवा या खाजगी बसने प्रवास करत असताना घाटाच्या सुरुवातीलाच ड्रायव्हरचा अचानक ताबा सुटून अपघात झाला. त्यामुळे त्यांना अधिक उपचार साठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page