⚡मालवण ता.१२-: कोणतेही काम हे अवघड नसते कामाला प्रयत्नांची जोड दिली आणि एकाग्र चित्ताने व मन लावून ते केले तर यश हमखास मिळतेच म्हणूनच विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आपल्या बरोबरच आपल्या चिंदर गावाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन चिंदर गावचे प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी येथे बोलताना केले
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमातर्गंत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थी, तसेच विविध स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे, प्रकाश मेस्री, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सौ. राजश्री कोदे, सौ. दुर्वा पडवळ, सौ. स्वरा पालकर, महेंद्र मांजरेकर, सौ. सानिका चिंदरकर, सौ. रिया घागरे, सौ. जान्हवी घागरे, माजी पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, दिगंबर जाधव, धनजंय नाटेकर, स्वानंद सुर्वे, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, समिर अपराज, सिध्देश नाटेकर, मनवा चिंदरकर, प्रिया पालकर, रोहिणी केळसकर तसेच बहूसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक भिमाशंकर शेतसंदी यांनी तर समारोप महेंद्र मांजरेकर यांनी केले.
