शासनाच्या अपुऱ्या कामामुळेच कार्डधारक धान्यापासून वंचित

मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष सुनील मलये यांचे स्पष्टीकरण*

*💫मालवण दि.०४-:* एकीकडे अन्नसुरक्षा कायदा सांगतो की एकही कार्डधारक धान्यापासून वंचीत राहता कामा नये आणि दुसरीकडे शासनाच्या अपुऱ्या कामामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाने फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून रेशन दुकानदारांना ऑफलाइन धान्य वाटप न करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. मालवणच्या धान्य दुकानदारांनी ऑफलाईन धान्य बंद झाल्या संदर्भात शासनाचे लेखी पत्र मागितले तरी ते धान्यदुकानदारांना अद्यापही मिळालेलं नाही तर काही तालुक्यामध्ये अजुनही ऑफलाईन धान्य विक्री चालू आहे.त्यामुळे मालवणच्या धान्य दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाच्या ऑनलाइन आदेशामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहिले तर रेशन दुकानदाराला जबाबदार धरू नये असे मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष सुनील मलये प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. मालवणमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये बहुतेक धान्यदुकानामध्ये कार्डधारक धान्यपासून वंचित राहिल्याच्या घटना घडल्या दुकानदाराने ऑफलाइन धान्य देण्याचे नाकारल्यामुळे धान्य दुकानांमध्ये कार्डधारकांचे रेशन दुकानदारा बरोबर वाद झाले. रेशन कार्ड अपडेट करण्याचे काम अर्धवट असताना शासनाने अचानक ऑफलाईन धान्य बंद करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आजारी अपंग व्यक्ती किंवा ठसा न लागणे काही कार्डांना ऑनलाइन नंबर नसणे काही कार्डांचा मशिनवरती प्रकार चुकीचा असणे अशा कारणांमुळे बरीच कार्डे माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये धान्यापासून वंचित राहिली त्याला सर्वतोपरी शासनच जबाबदार आहे कारण कार्ड अपडेट करणे हे धान्य दुकानदाराचे काम नसून पुरवठा विभागाचे काम आहे. कित्येक कार्डधारकांनी आपली कार्ड दुरुस्ती करण्यासाठी पुरवठा विभागामध्ये दोन-दोन तीन-तीन वेळा रेशन कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स देऊनही सहा महिने झाले तरी कार्ड अपडेट काही होत नाहीत आणि त्यात रेशन दुकानदार यांना ऑनलाईन धान्य देण्याचे आदेश आल्यामुळे वंचित राहिलेले कार्डधारक असं म्हणत आहेत की तीन-तीन वेळा कागद देऊनही आम्हाला धान्य मिळत नसेल तर आमचा दोष काय ? आणखी किती वेळा आम्ही कागद द्यायचे ? खैदा कातवड येथील सिताराम चव्हाण यांनी आपलं कार्ड दुरुस्ती करण्यासाठी तीन वेळा कागद देऊनही त्यांचं कार्ड अजुनही दुरुस्त झालेलं नाही आजही ते आपलं रेशनकार्ड ऑनलाईन दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागामध्ये फेऱ्या मारत आहेत यावरुन शासनाच्या कामाची आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येते रेशनकार्ड अपडेट करण्याची पूर्ण यंत्रणा ही शासनाच्या पुरवठा विभागाकडूनच चालते रेशन दुकानदाराकडे कार्ड अपडेट करण्याची कोणतीही सोय नाही. शासनाच्या अपुऱ्या कामामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित….! चारच दिवसांपूर्वी एका पक्षाचे शिष्टमंडळ धान्य न मिळालेल्या कार्डधारकांना घेऊन मालवण पुरवठा विभागामध्ये विचारणा करण्यासाठी गेले होते तसेच धान्य न मिळालेल्या कार्डधारकांना ऑफलाइन पद्धतीने धान्य देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती त्यावेळी मालवणचे अव्वल कारकून असलेले कोयंडे यांनी त्या शिष्टमंडळाला असं सांगितलं की धान्य दुकानदार आम्हाला सहकार्य करत नसल्यामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहिले आहेत परंतु आम्ही त्याचं स्पष्टीकरण करतो कि जे कार्डकार्डधारक धान्यापासून वंचित राहिले त्‍याला धान्‍य दुकानदाराचा काहीही संबंध नसून त्यास परिपूर्ण शासनच जबाबदार आहे. शासनाच्या अपुऱ्या कामामुळेच कार्डधारक धान्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि यापुढे जर पुरवठा विभागाकडून धान्यापासून वंचित राहिलेल्या कार्डधारकांना दुकानदाराच्या चुकीमुळे तुम्हाला धान्य मिळाला नाही असं सांगून दुकानदाराविरोधात जर भडकविण्याचा प्रयत्न केल्यास यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. शिधापत्रिका शोध मोहीम धान्य दुकानदाराच्या माथी मारू नये…..! कित्येक वेळा रेशन दुकानदाराला ऑनलाइन प्रणालीमुळे नेटवर्क प्रॉब्लेम असणे, मशीन अचानक हँग होणे, सर्व्हरचा प्रॉब्लेम असणे अशा अनेक संकटांना तोंड देत धान्य वितरण करावे लागत आहे. रेशन दुकानदार हा फक्त शासनाचा कमिशन एजंट असून त्याचं काम धान्य खरेदी करणे ते रेशन कार्डधारकांना वाटप करणे त्याची माहिती संबंधित पुरवठा विभागाला कळवणे एवढंच असूनही रेशन दुकानदार आतापर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक शोध मोहिमेमध्ये अडचणीच्या वेळी शासनाचा पगारी नोकर नसूनही शासनाला मदत करत आलेला आहे. आता पुन्हा शासनाकडून शिधापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे. ही शोध मोहीम शासन परिपत्रकाप्रमाणे शासनाकडून नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच पुर्ण करुन घेण्यात यावी. ती धान्य दुकानदाराच्या माथी मारू नये कारण जर धान्यदुकानदाराकडून ही शोध मोहीम राबवली गेली आणि शासनाच्या काही निकषांमुळे काही कार्डाचं धान्य जर शासनाकडून बंद करण्यात आले तर धान्य द

You cannot copy content of this page