*पहिली केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घ्या नंतरच तारीख जाहीर करा

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा खोचक टोला*

*💫कणकवली दि.०४-:* चिपी एअरपोर्टच्या अनेकदा उद्घाटन तारखा जाहीर झाल्या आहेत.तर सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री,पालकमंत्री असताना अनेकदा दगड लावत आपली नावे कोरली. शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणपती आणत विमान उतरवलं.शिवसेना खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला उद्घाटन करण्याचे जाहीर केले.पण अद्याप उद्घाटन झाले नाही,ही जनतेची चेष्टा चालवली आहे.पहिल्यादा केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घावी,नंतरच तारीख जाहीर करावी.त्या दोन्ही आदरणीय खासदारांनी विमानतळासाठी एकत्र यावे.त्याशिवाय शिवसेना खासदारांनी विमानतळ उद्घाटनाची तारखा जाहीर करु नये,असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला.कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी आणि मनसेने गेल्या दोन ते तीन महिने विमानतळ होणार नाही.हे मनसेने सांगितले होते. परत शिवसेना खासदारांनी तिसऱ्यादा जाहीर केले ,१ मार्चला केंद्रीय उड्डाण समिती आली त्यांनी त्रुटी आहेत असे सांगितले. केंद्राच्या सत्ताधारी खासदार यांनी ३ वेळा शिलाण्यास करत अनेक आश्वासने दिली आहेत.या केंद्र व राज्य सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पण तारीख दिली होती. पण अद्याप विमानतळ चालू नाही.भाजपा खासदार नारायण राणेंना नरकासुर बकासुर अशी उपमा देणारे शिवसेना खासदार विनायक राऊत त्याना आदरणीय म्हणू लागलेत. राऊत आणि राणे यांनी चिपी विमानतळ होण्यासाठी एकत्र यावे.१५० रुपये गुंठ्यानी जमीन दिलेल्या लोकांना विमान उतरल्याने समाधान लाभावे. आता तारीख देताना केंद्रीय उड्डाण समितीचे परवानगी आल्यानंतर द्यावी,अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली. सत्ताधारी शिवसेना खासदारांनी कुडाळ महिला हॉस्पिटल चालू होणार असल्याची अनेकदा घोषणा केली,मात्र अद्याप हे रुग्णालय सुरु झाले नाही.घोडगे घाट जनता आंदोलन करणार असे म्हणताच ४ कोटी देत उंची वाढविण्यासाठी निधी दिल्याची घोषणा केली.पण त्या ग्रामस्थांनी आंदोलन केल्यास मनसे सहभागी होईल,असे परशुराम उपरकर यांनी जाहीर केले.

You cannot copy content of this page