दांडेली रस्त्यावर माती ओतल्याने धोका…

प्रशासनाचे दुर्लक्ष;अपघात घडण्याची शक्यता

*💫बांदा दि.०४-:* दांडेलीहून बांद्याच्या दिशेने जाताना उतरणीवर अज्ञात वाहनाने सुमारे दहा मीटर अंतरावर माती ओतण्याची घटना घडली. सदर घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील माती बाजूस करण्याची मागणी वाहनचालक तसेच नागरिकांमधून होत आहे. बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली येथे बांद्याच्या दिशेने असलेल्या एका उतरणीवर अज्ञात वाहनाद्वारे काळीमाती ओतण्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रंदिवस रहदारी चालू असलेल्या या मार्गावरून अनेक मोठाल्या गाड्या ये जा करत असतात. आठ दिवसांचा कालावधी उलटूनही रस्ता व्यवस्थित केला नसल्यामुळे अडथळे निर्माण होत असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संभाव्य अपघाताचा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी असलेली माती दूर करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page