टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा

⚡ओरोस ता.०४-: भारतीय डाक विभागामार्फत यावर्षी “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय “नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया” असा असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहेत. ही स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक डाकघर मयूर कोले यांनी कळविले आहे.


पत्र लेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा, साधा लिफाफ्यामधून (आवश्यक तिकीट लावून) ए – 4 साइज पेपर वर जास्तीत जास्त १००० शब्द व आंतरदेशीय पत्रावर जास्तीत जास्त ५०० शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर, आंतरदेशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा तसेच लिफाफा, आंतरदेशीय पत्रावरील बाजूस “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे. स्पर्धकांनी ही पत्रे ३१ ऑगस्त्व२०२३ पर्यंतच चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठवावे.
महाराष्ट्र मंडळ स्तरावरील निवडक पहिल्या तीन पत्रांना (गटा प्रमाणे) प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक १० हजार रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये ची पारितोषिके दिली जातील. मंडळ स्तरावरील तीन बक्षीस पात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमांकाच्या पत्रांना अनुक्रमे ५० हजार रुपये, 25 हजार रुपये व १० हजार रुपये अशी पारितोषिके दिली जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुर कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता नजीकच्या डाकघरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page