बंटी पुरोहीत ; कचरा साचून राहिल्याने सौंदर्याला बाधा
⚡सावंतवाडी ता.०४-: मोती तलाव हे सावंतवाडी शहराचा मुख्य ठिकाण असून त्यामध्ये कचरा साचून राहिल्याने शहरातील सौंदर्याला बाधा येत आहे. तसेच प्रत्येक प्रभागात व गल्लीमध्ये देखील झाडी वाढलेली आहेत त्यामुळे तात्काळ साफसफाई करून घ्यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी निवेदनद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान प्रत्येक प्रभागात डासांचं प्रभाव देखील वाढलेला आहे त्यासाठी देखील उपयोजना करण्यात यावी अशी ही विनंती पुरोहित यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
