ओरोस ता ४
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवकांच्यावतीने १० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथील विभागीय डाकघर कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांसाठी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेकेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (ए.आय.जी.डी.एस.यु.दिल्ली) व महाराष्ट्र सर्कल प्रदेश शाखेच्यावतीने तसेच केंद्रीय शाखा न्यू दिल्लीच्या आदेशानुसार १० ऑगस्ट २०२३ रोजी डाक अधीक्षक सिंधुदुर्गनगरी यांच्या विभागीय कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांबाबत संघटना प्रतिनिधी दुपारी २ ते ५ या वेळेत विभागीय कार्यालयाच्या समोर धरणा आंदोलन करणार आहे. हा धरणा कार्यक्रम आम्ही शांततेच्या मार्गाने व कार्यक्रमाला कोणतेही गालबोट न लावता राबविण्यात येणार आहे.
