⚡मालवण ता.०३-: मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता नगर वाचन मंदिरच्या वाचन कक्षात आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील गट पहिला तालुकास्तर असून यात मालवण तालुक्यातील सर्व शाळांचे ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटाची स्पर्धा सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या गटासाठी माझा आवडता, माझं आवडत पर्यटनस्थळ, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील एक दिवस असे विषय आहेत. दुसरा गट जिल्हास्तरीय असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे ८ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी सध्याचे राजकारण आणि सर्वसामान्य नागरिक, चांद्रयान (भारताची चंद्रावर स्वारी), आत्महत्याचे वाढते प्रमाण – एक गंभीर समस्या असे विषय आहेत. हि स्पर्धा दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी दि. १० ऑगस्ट पर्यंत स्पर्धकाच्या भ्रमणध्वनीसहित ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत नावनोंदणी करावी, स्पर्धेचा निकाल स्पर्धा समाप्तीनंतर लगेच जाहीर करण्यात येईल. यशस्वी स्पर्धाकांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ग्रंथापाल संजय शिंदे ९४२२२३४९५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह प्रा. नागेश कदम यांनी केले आहे.
