कुडाळ मालवण मधील विकाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तीन वर्षे लागतील

भाजप सरचिटणीस निलेश राणे:
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांचा भाजपात प्रवेश

मालवण दि प्रतिनिधी
गेल्या नऊ वर्षात मालवण कुडाळ मतदार संघात विकासाची कामे न झाल्याने हा मतदार संघ विकासाच्यादृष्टीने मागे पडला आहे. या मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अडीज तीन वर्षे लागणार आहेत. विकास हा भाजपच करू शकतो, अन्य कोणत्याही पक्षाची डाळ शिजणार नाही, हे माहित झाल्याने आता भाजपामध्ये नजर जिथं पर्यंत पोहचते तिथं पर्यंतचे लोक भाजपात प्रवेश करत आहेत. येत्या काळात या मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग निश्चित भरून काढला जाईल, अशी ग्वाही भाजपचे राज्य सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले.

मालवणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांनी आज भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या मालवण येथील कार्यालयात हा भाजप पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, भाई मांजरेकर, पंकज पेडणेकर, अवी सामंत, प्रमोद करलकर, सौरभ ताम्हणकर, आबा हडकर, मोहन वराडकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, चारुशीला आचरेकर, सौ. महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर यांच्यासह माजी नगरसेवक पंकज सादये आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर यांनी विचार मांडताना निलेश राणे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासाच्या कामांची माहिती दिली.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, पंकज सादये आज भाजपात दाखल झाले आहेत. येत्या काळात त्यांच्या मनात शहर विकासाची जी संकल्पना असेल ती पूर्ण केली जाईल यापुढे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. आमची ताकद आज वाढली आहे. येत्या काळात तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करू. दांडी येथे रस्ता कम बंधारा करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. ते काम आम्ही करून देणार. पालकमंत्री यांच्या मार्फत पाठपुरावा सुरु आहे. उद्या न. प., जि. प. निवडणूक आहे. सगळीकडे भाजपामध्ये प्रवेश होत आहेत. बदल घडवण्याची ताकद फक्त भाजपात आहे. नऊ वर्षात आपला मतदार संघ विकासात मागे पडला आहे. हा बॅकलॉग भरण्यासाठी आणखी काही वर्ष कमी पडतील. या मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधीची तफावत आहे. आता आपल्याला भरपूर निधी आणायचा आहे. मालवण शहर आपल्याला पुढे न्यायचे आहे. दांडी भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असेही ते म्हणाले यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page