शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमीत्त महारक्तदान शिबिराचे आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधी
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रावराणे परिवार मित्र मंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब वैभववाडी आणि राजेश पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या वतीने दिनांक ७ ऑगस्ट रोजी भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यांना रक्तदान करावयाचे आहे त्यांनी राजेश पडवळ, संजय रावराणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत होणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page