“त्या” वृद्ध महिलेच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा…

मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांची निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गुन्हा चालविला जावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी वैभववाडी तहसीलदार व वैभववाडी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी महेंद्र उर्फ भया कदम,रुपेश वारंग आदी उपस्थित होते.मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील लोकांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध करत संबंधित आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
तसेच पर राज्यातून जिल्ह्यातून मजुर, वाळु कामगार, चायनीस सेंटर मध्ये काम करणारे तसेच आंबा बागेत काम करणारे नेपाळी, बोअरवेल खोदकाम कामगार तसेच विविध उपकरणे किंवा वस्तु विकण्यासाठी येणारे नोंद नसलेले व्यापारी गावा गावात शहरात भाडे तत्वावर राहाणारे माणसे यांच्या कोणत्याही नोंदी ठेवल्या जात नाही. त्यांची पार्श्वभूमी तपासली जात नाही. तरी त्यांच्या नोंदी ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात पोलीस स्टेशन मध्ये करण्यात याव्या. अशीही मागणी या निवेदनाद्वारे मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
फोटो पोलीस निरीक्षक मेगंडे यांना निवेदन देताना सचिन तावडे,भया कदम, रुपेश वारंग आदी उपस्थित होते.छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page