आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी दिले आश्वासन
⚡सावंतवाडी ता.०२-: बंद असलेली सावंतवाडी वेंगुर्ला(तुळस मार्गे) संध्याकाळी ४.३० ला सुटणारी बस उद्यापासून पूर्ववत चालू करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सिद्धेश तेंडोलकर व मळगाव तळवडे ग्रामस्थांना दिले.
सदर बस काही दिवस बंद असल्यामुळे संध्याकाळी मळगाव मधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते याबाबत आज आवाज उठवण्यात आला. उद्यापासून जर बस पून्हा चालू झाली नाही तर वेंगुर्ला आगाराच्या सर्व बसेस मळगाव चौकी येथे अडवण्यात येतील असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला यावेळी उदय सावंळ, सिद्धेश तेंडुलकर, शंकर सावंत (तळवडे), इम्रान करोल, रमेश पांढरे (निरवडे )अंकुश राऊल,मनीष गवंडे, महेश गवंडे, सत्यजित राऊल, रुपेश सावत (तळवडे), हेमंत गोसावी ज्ञानेश्वर रावुल उपस्थित होते.
