⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी विभागार्फत हिंदी साहित्यातील महान कथाकार मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हिंदी विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा आढावा घेत प्रेमचंद यांनी सर्व सामान्य जनतेचे दुःख व कष्टकरी, शोषित समाजाचे चित्रण आपल्या साहित्यातून प्रभावीपणे केले, असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. हंबीरराव चौगले, IQAC प्रमुख प्रा. सुमेधा नाईक, प्रा. के. के. राबते, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी प्रेमचंद यांचा जीवनप्रवास वर्णन करत त्यांच्या साहित्याची माहिती दिली. प्रा. राबते, प्रा. खोबरे यांनीही विचार मांडले. विद्यार्थ्यांमधून दिपीका चव्हाण, श्रावणी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हिंदी विभागामार्फत ‘शुद्धलेखन प्रतियोगिता’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक – दिपीका ज्ञानेश्वर चव्हाण, द्वितीय – लक्ष्मी दत्ताराम पारकर, तृतीय – कुणाल हरिश्चंद्र शिरोडकर व सुरज संदीप गावडे, उत्तेजनार्थ आदित्य अनंत सावंत व मनाली राजेंद्र तांबे यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अन्वेषा कदम यांनी केले. आभार प्रा. सुमेधा नाईक यांनी मानले. यावेळी प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. बी. एच. चौगुले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
