स्वच्छता अभियानाच्या केंद्रीय तपासणी समितीकडून बांदा शहराची पाहणी

बांदा शहराची देशपातळीवर निवड : घरे, वाचनालय, शाळांची केली तपासणी

बांदा/प्रतिनिधी
भारत स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झालेल्या बांदा शहराची आज केंद्रीय तपासणी समितीने पाहणी केली. शहरातील घरे, सार्वजनिक वाचनालय, जिल्हा परिषद शाळा यांची तपासणी करण्यात आली.


स्वच्छता अभियानात बांदा ग्रामपंचायतची पहिल्या २० ग्रामपंचायत मध्ये निवड झाली आहे. बांदा शहराची देशपातळीवर निवड झाली आहे. आज सकाळी केंद्रीय तपासणी समिती प्रमुख चंदन यादव, पाणी व स्वछता विभाग तज्ञ इंदिरा परब, सावंतवाडी पंचायत समितीचे अविनाश सावंत, सामील नाईक यांच्या पथकाने पाहणी केली.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळु सावंत, रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, दिपलक्ष्मी पटेकर, आत्माराम बांदेकर, संजय सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page