कुडासेतील आपदग्रस्त कुटुंबाला उद्धव सेनेकडून आर्थिक मदत

⚡दोडामार्ग,ता.२८-: अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळलेल्या
कुडासे धनगरवाडी येथील वरक कुटुंबीयांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे कुडासे वानोशी (धनगरवाडी) येथे शनिवारी (ता.22)रात्री आठच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय 65) या जेष्ठ महिला जखमी झाल्या होत्या तर त्यांची सून व दोन लहान नातवंडे बाहेरच्या दिशेने पळाल्याने तिघेही सुखरूप राहिली होती.
भगवान वरक यांचे कुडासे वानोशी येथे राहते घर आहे .ते याठिकाणी आपली वयोवृद्ध आई , बायको दोन लहान मुलांसह राहतात .ते शनिवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात त्यांची आई, बायको व लहान मुले होती.तालुक्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता.साधारण ८ च्या दरम्यान ठकी वरक आंघोळीसाठी घराच्या मागे गेल्या होत्या,तर त्यांची सून व नातवंडे पुढच्या बाजूला भिंतीपलीकडे होती.तेवढ्यातच घराची मधली भिंत अचानक कोसळली.प्रसंगावधान राखून त्यांची सून आपल्या दोन मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने पळाल्या, त्यामुळे त्यांना मुलांनां कोणतीही इजा झाली नाही; मात्र ठकी वरक जखमी झाल्या होत्या.वरक कुटुंबीयांवर ओढवलेली नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन स्थानिकांनी त्या कुटुंबाचे दुसरीकडे स्थलांतर होते होते. त्यांच्या घरातील तांदूळ गोटा व अन्य जीवनावश्यक साहित्य भिजून गेले होते. त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघाचे प्रमुख शैलेश परब,जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी,बाळा गावडे,संपदा देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page