⚡मालवण ता.२८-: मालवण मनसेच्या वतीने मालवण येथील कुडाळकर हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मनसे मालवण संपर्क प्रमुख राजू साटम यांच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले, अशी माहिती मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली.
यावेळी विशाल ओटवणेकर यांच्यासह युवा कार्यकर्ते व उद्योजक प्रितम गावडे, रामनाथ पराडकर, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, प्रशांत पराडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, नितीन राठोड, श्रीकृष्ण परब व अन्य उपस्थित होते.
