कळणे घाटीत ट्रक फसला

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत..

⚡दोडामार्ग,ता.२७-:
कळणे घाटीत एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या चरात चाके रुतल्याने बांद्याकडे जाणारा ट्रक फसला.एमएनजीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेपर्वाइमुळे रस्त्याच्या बाजूपट्टीवर वाहने फसल्याने अपघात होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.त्यामुळे कंपनी आणि बांधकाम विभागाने समन्वयाने रस्त्याची बाजूपट्टी मजबूत करून अपघात टाळावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

You cannot copy content of this page