⚡बांदा ता.२७-: येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो.
देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन केल जात. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक दिलीप गोविंद भिसे व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भिकाजी, मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, शिक्षिका हेलन रॉड्रीग्स, रसिका वाटवे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘दुनिया करते ज्याला सलाम तोच आहे भारताचा सैनिक महान’ या वाक्याशी समन्वय साधून शाळेत शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्रीशा सावंत आणि अथर्व नेमळेकर या विद्यार्थ्यांनी कारगिल दिवसाचे महत्त्व सांगितले. सैनिकाचे जसे लोकांची रक्षा करणे हे कर्तव्य आहे तसेच जे सैनिक शहीद होऊन आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले त्यांच्याप्रती नुसता आदरच नव्हे तर त्यांनी मिळवून दिलेल्या स्वतंत्र्याचा सांभाळ करणे हे आपले कर्तव्य आहे.
कारगिल दिवस हा फक्त विजय नसून भारताच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे. त्याचा आपण सर्वांनी आदर्श ठेवला पाहिजे. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माजी सैनिक दिलीप भिसे यांनी आपल्या १९ वर्षांच्या सैनिकी जीवनाबद्दल सांगताना, सेवेच्या काळात शारीरिक स्वास्थ कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. तांत्रिक विभागात काम करताना युद्धासाठी नव्हे तर आपल्या देशासाठीच नव्हे तर आपल्या स्वत:साठी आपल्याकडे सर्व गुण असायला हवे हे त्यांनी स्वानुभवातुन सांगितले.
यावेळी एनसीएफ टीमचे शिक्षक टीम लीडर गुरुनाथ पाटील, प्रथमेश पावस्कर, अनिकेत पाटील, सम्मेद शेटे, वैष्णवी सुतार व मानसी खानदारे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कल्पना परब यांनी केले तर आभार शिक्षिका स्नेहा गावडे यांनी मानले.
व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा
