अर्चना घारे: पीजीआय सर्वेक्षणातून उघड; शिक्षण मंत्री म्हणून केसरकर अपयशी
⚡सावंतवाडी ता.२५-: नुकताच पीजीआय सर्वेनुसार महाराष्ट्र राज्य शिक्षणाचा दर्जा हा घसरला असून दोन नंबर वरून असलेला महाराष्ट्र राज्य हा 7 नंबर गेलाय त्यामुळे केसरकर हे पूर्णपणे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरलेत असा आरोप राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी आज येथे केला.
दरम्यान राज्यात शिक्षण खात्यात नवीन नवीन जीआर का काढले जातात सकाळी एक जीआर संध्याकाळी एक जीआर काढून मुलांना व पालकांना का खेळवलं जातय असा संताप्त सवाल ही देखील घारे परब यांनी यावेळी उपस्थित केला.
