मनिपूर सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट आणा

अर्चना घारे परब: मणिपुर घटने विरोधात राष्ट्रवादी कडून मौन आंदोलन..

सावंतवाडी ता.२५-: मणिपूर येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून यावर अद्याप कोणतेही कारवाई करण्यात आली नसल्याने आज सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील गांधी चौकात हिंसाचारच्या विरोधात दंडाला काळ्या फित लावून मौन आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान मनिपुर येथील सरकार बरखास्त करून तात्काळ राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे. त्या सावंतवाडीत मौन आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले शहराध्यक्ष देवा टेमकर ,राकेश नेवगी, रेवती राणे सायली दुभाषी, सावली पाटकर,अँड. राबिया शेख ,आसिफ खान, बावतीत फर्नांडिस, आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page