महाराष्ट्राच्या राजकारणातील ”वजनदार” नेता…

माजी आमदार राजन तेली:जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार संघर्षमय प्रवास…

सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा शतःप्रतिशत भाजपमय करण्याबरोबरच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात संघटनात्मक बांधणी करुन सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाचे कमळ फुलविण्याची कियमा साधत
सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच धडपडणारा नेता म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात नेहमीच आपले वजन राखलेला मंत्र्यांशी जवळीक असेलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज (ता.२५) त्यांचा वाढदिवस. यानिमित्ताने ‘ग्लोबल महाराष्ट्र’कडून त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सतत चर्चेत राहणारे नाव म्हणजे माजी आमदार राजन तेली जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार हा त्यांचा प्रवास तसा संघर्षमयच आजही त्याचा आपल्या राजकीय वाटचालीतील संघर्ष सुरुच आहे. मागे वळून न पाहता नेहमी आव्हाने पेलत त्यांनी आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. त्यांनी आपल्यातील कुशल संघटक या गुणातून केलेली राजकीय बांधणी त्यांना एक दिवस त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच नेईल यात तिळमात्र शंका नाही.
कणकवली तालुक्यातील घोडगेसारख्या खेडेगावातून येत महाविद्यालयाच्या जीएस पदापासून त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. महाविद्यालयापासूनच त्यांचे नेतृत्व, कुशल संघटक म्हणून झलक दिसून आली होती. यानंतर कणकवली शहराचा उपशहरप्रमुखापासून ते थेट विधान परिषद आमदार असा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.
१९९५ ला शिवसेना जिल्हाप्रमुखपदी त्यांची थेट निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना नंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत पक्षाची सत्ताही जिल्हा परिषदेवर आणली. पहिल्याच टर्ममध्ये १९९९ ला तेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले. अगदी ठाण्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत धरणांच्या कामांना तेली यांनी गती दिली. जिल्ह्याचा सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत त्यांना दोनवेळा पराभवाला सामोरे जावे लागले; मात्र, हताश न होता त्यांनी आपले समाजकारण नेहमीच सुरू ठेवले. येथील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात आंबोली, गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेली धडपडीला अखेर यश आले आणि अलीकडेच हा प्रश्न मार्गी लागला. मंत्रालयात असलेले वचन तसेच भाजपाच्या नेत्याशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबध पाहता त्यांनी हा प्रश्न सुरवातीपासूनच उचलून धरला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा प्रश्न कोणी सोडविला तर तो राजन तेली यांनीच म्हणावे लागेल.
काल परवाच ते भाजप जिल्हाध्यक्ष पदावरुन पाय उतार झाले मात्र या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यात शतःप्रतिशत भाजप करण्यावर भर दिला आणि ते त्यात यशस्वीही झाले. अलिकडेच जानेवारी महीन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यात त्यांना यश आले. राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी त्यांनी जिल्ह्यात पर्यायाने सावंतवाडी मतदार संघात उपलब्ध करुन दिला. यात गेले कित्येक वर्ष रखडलेले व जनतेची मागणी असलेले रस्ते मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. मुळात भाजपाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन विकास कामांचे नारळ मात्र राजकिय विरोधकांकडून फोडताना त्यांनी कधीच श्रेयवादाचे राजकारण केले नाही. त्याच्याकडे असलेले संघटनात्मक बांधणीची किमया पाहता प्रदेशकडून त्याच्यावर सावंतवाडी मतदार संघाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे. त्याच्यातील नेतृत्व म्हणून पाहता त्याच्याकडे ज्या हेतूने ही जबाबदारी सोपविली तो होते ते नक्कीच साध्य करतील. त्यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र’कडून खुप खुप शुभेच्छां…!!!!

You cannot copy content of this page