प्रवीण भोसलेची टीका: वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवणे गरजेचे होते…
⚡सावंतवाडी ता.२५-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतु त्यांना जनतेच्या प्रश्नांचे सोयर सुतक नसून त्यांनी आपला वाढदिवस मात्र धुमधडाक्यात केला अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.
दरम्यान सिंधुदुर्गातील तसेच विशेषता सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला ज्या प्रकारे लोकप्रतिनिधीकडून न्याय मिळायला पाहिजे होता मात्र तसा न्याय मिळत नसून फक्त जनतेच्या जीवावर मंत्रिपद मिळून मुंबईला वास्तव्य करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. हे सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात राज्यात नक्कीच परिवर्तन होऊन विशेषता सावंतवाडी मतदारसंघात देखील परिवर्तन होणार असून येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून राज्यात पवार सरकार येईल असा विश्वास आहे त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच हे सरकार मात्र थोडाफोडीच्या राजकारणातच गुंतला असून जनतेच्या प्रश्नांकडे मात्र यांचं दुर्लक्ष असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
