बांदा येथे उद्या ‘भरत भेट नाट्यप्रयोग…

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे आषाढ महोत्सवानिमित्त आयोजन

⚡बांदा ता.१३-: सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर आयोजीत आषाढ महोत्सव २०२३ निमित्त ‘भरत भेट’ हा महान पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी दिनांक १४ जुलै रोजी रात्री ठीक ८ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

यात गणपती- प्रतीक कलिंगण, दशरथराजा उदय राणे, कली-दादा राणे, वशिष्ठ मुनी-प्रथमेश खवणेकर, इंद्र-गौरव शिर्के, नारद- चारु मांजरेकर, कैकयी-बंटी कांबळी, मंथरा – शिवा मेस्त्री, राम- सिद्धेश कलिंगण, लक्ष्मण-आबा कलिंगण, सिता – गौतम केरकर, भरत – सागर गावकर, सुमंत प्रधान-पिंटो दळवी, नावाडी-कृष्णा घाटकर व संगीत साथ म्हणून हार्मोनियम आशिष तवटे, मृदुनगमणी – पीयूष खंदारे, झंज – विनायक सावंत या कलाकारांचा सहभाग आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page