साटेली भेडशी थोरलेभरड येथील प्रकार:मौल्यवान वस्तू, पैसे घरात नसल्याने चोरट्याने घेतला काढता पाय
दोडामार्ग,ता.13-:साटेली भेडशी थोरलेभरड येथील बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न फसला.घटना बुधवारी मध्यरात्री घडली असण्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या छप्पराचे कौले काढत घरात प्रवेश केला; मात्र घरात कोणतीही किमती वस्तू व पैसे नसल्याने त्याने काढता पाय घेतला. असे असले तरी चोरीचा प्रयत्न झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोरलेभरड येथील अमित वसंत राऊळ यांच्या बंद घराच्या छपरावरील नळे काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्या घरात कोणीच राहत नसल्याने घरात चोरट्याला रोख रक्कम किंवा किमती वस्तू मिळाल्या नाहीत.त्यामुळे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या त्या अज्ञात चोराला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. चोरी फसली तरीही साटेली भेडशी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी बाजारपेठेसह गावात आपली गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
