नावळेत कृषिविभागाकडून नाचणी बियाण्याचे वाटप

वैभववाडी संजय शेळके
नावळे गावात कृषिविभागाच्या मार्फत मोफत ” नाचणी” या भरड धान्य बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी सरपंच कुमारी सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके,सौ रश्मी गुरव, मंडळाचे अध्यक्ष नामदेव सावंत, सचिव प्रकाश गुरव, सदस्य अनिल पाटील, सचिन घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, शेतकरी सुभाष गुरव,सौ शर्वरी रावराणे, राजेंद्र सावंत, कृषी सहायक दिपक मसेकर, विलास गुरव, अंकिता गुरखे,लता गुरखे दशरथ गुरव आदी शेतकरी उपस्थित होते.
हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष जाहीर झाले आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे .याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी केंद्राने हा उपक्रम चालु आहे .पुर्ण तालुकाभर या भरड धान्या विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, कुट्टू, राजगिरा, कोंदरा, कुटकी, वरी, राळा या धान्याचा समावेश आहे.
वैभववाडी तालुक्यात जिथे भरड धान्य पिकवल जाईल त्या गावातील शेतकऱ्यांचा वैभववाडी ता.ख.वि.संघा मार्फत सन्मान, तसेच भरड धान्याचे उपयोग करून विविध पीठ तयार करणाऱ्या गृह उद्योग संस्थां व बचत गटांचा ही सन्मान करण्यात येणार असल्याचे असे कृषी सहायक दिपक मसेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page