कबुलायतदार जमिन प्रश्न ; प्रश्न सुटला की न सुटला
⚡आंबोली, ता.११:अनिल चव्हाण-: श्रेयवाद,पोस्टरबाजी,बॅनर बाजी नंतर आता युवकांकडून मिम्स द्वारे ट्रोलिंग. आंबोली कबूलायतदार जमीन प्रश्न सुटला की न सुटला ग्रामस्थांच्या हाती सध्या तरी काहीच नाही.त्यामुळे राजकीय श्रेयवाद आणि बॅनर बाजी चा ज्या पद्धतीने दाखवली गेली आणि प्रत्यक्षात हाती काही लागेल की नाही याबाबत साशंकता उत्पन्न सध्या तरी झाली आहे. आणखी किती काळ लागेल की वनखात्याच्या अखत्यारीत हे देखील रखडेल हा प्रश्न आहे.केंद्रीय वनमंत्र्याकडे जाऊन हा प्रश्न सोडवतो किंवा त्याठिकाणी कोणी राजकीय वजन वापरता दिसून येत नाही.त्यामुळे केवळ मतपेटी म्हणून बघायचे तातडीने या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन ध्येयाने हा समूळ प्रश्न सोडवतो असे कोणी नाही.२४ वर्षे हा प्रश्न राखडलाच आहे.
मात्र त्याचबरोबर निम्मी देखील जागा राहिली नाही.दरवर्षी बाहेरच्या लोकांची अतिक्रमणे वाढत असून काही लोकांनी बिनधास्तपने विकली आहे आणि श्रीमंत झाले आहेत मात्र सामुदायिक कमी झाली आणि याचा फटका गावातील सर्व लोकांना बसत आहे.सध्या तरी हा प्रश्न आणि राजकीय श्रेयवाद आणि त्याचा फायदा काही गिऱ्हाईक आणून विकणारे घेतील. बांधकामे करून कंपाउंड घालून मोकळे होतील.ठराविक काही जण तुपाशी आणि गावातले बहुसंख्य उपाशी अशी स्थिती आहे.त्यामुळे लवकरच हा प्रश्न सोडवण्याची आशा होती.मात्र भ्रमनिरास झाला आहे.

सत्तेचं नाव सांगतात आपलीच सत्ता सगळीकडे आहे.मात्र त्याचा आम्हाला काय फायदा असे लोक आता विचारत आहेत.राजकारणी आपल्या फायद्यासाठी याचा वापर करून जमिनी बळकवतात आणि आपल्याच मालकीची असल्याचे प्लॅनिंग करतात.खऱ्या अर्थाने राजकीय स्वार्थासाठी हा प्रश्न रखडला आहे हे सत्य आहे.त्यामुळे त्यावर आता मिम्स द्वारे ट्रोलिंग केलं जातं आहे.लोकांना युवकांना देखील आता याचा कंटाळा आला असून सर्वच पुढारी असे आहेत असे मत तयार होत आहे. केवळ काही कार्यकर्ते जमा करून लोकांना आपल्यासोबत ठेवायचे एवढे मात्र नक्की जमते.जनतेचा खरोखर फायदा करणारे असे नेते नाहीत असे यातून दिसून येत आहे.त्यामुळे आता मिम्स द्वारे ट्रोलिंग केलं जातं आहे.
