महाशक्ती शरद पवार

सावंतवाडीत झळकले बॅनर:सिंधुदुर्ग राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे समर्थकांकडून दाखविण्याचा प्रयत्न

सावंतवाडी ता.०८ प्रसन्न गोंदावळे-: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी मारल्यानंतर राज्यभरात शरद पवार व अजित पवार यांना आपले नेते मानणाऱ्या दोन्ही गटांकडून बॅनरबाजी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे समर्थन करणारे बॅनर सावंतवाडीत झळकले आहेत. “महाशक्ती शरद पवार” असे या बॅनरचे टायटल असून शरद पवार यांचा उभा फोटो या बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात शरद पवार हेच जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

You cannot copy content of this page