सांगेली येथील तरुणाचे आकस्मिक निधन

⚡सावंतवाडी ता.०८-: सांगेली आंबेडकर नगर येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबईत घनसोली येथे नोकरीनिमित्त राहणाऱ्या श्याम यशवंत सांगेलकर यांचा एकुलता एक मुलगा ओमकार वय वर्ष 23 यांचे आज पहाटे मुंबईत उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओमकार हा नोकरी निमित्त हैदराबाद येथे असताना काही दिवसांपूर्वी तो चक्कर येऊन पडला होता त्यानंतर त्याच्या मित्रपरिवाराने त्याला तेथीलच खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला विमानाने मुंबईत आणले होते व उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथून जे जे व त्यानंतर भाटिया अशा रुग्णालयात उपचार करूनही उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी वाशी नवी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले होते मात्र पहाटे त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, काका, काका, काकी असा मोठा परिवार असून मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page