शरद पवार यांच्या पाठीशी आपण यापुढेही खंबीरपणे उभे राहू…

नंदकुमार शेठ घाटे:देवगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक संपन्न

⚡देवगड ता.०६-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काँग्रेस पक्षापासून चे आपले असलेले संबंध व पक्षकार्य लक्षात घेता शरद पवार हेच आपले ज्येष्ठ मार्गदर्शक व नेते असून त्यांच्या पाठीशी देवगड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे संचालक हे गंभीरपणे पाठीशी उभे असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे आपण पाईक आहोत. यापुढेही त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य देवगड तालुक्यात करणार असल्याची स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विशेष बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगड कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी यापुढील काळात ठामपणे उभे राहून राष्ट्रवादी पक्षाचे कार्य करावे व शरद पवारांना साथ द्यावी असे सर्वानुमते ठरविण्यात येऊन या बाबतचे प्रकारचे लेखी पत्र पदाधिकाऱ्यांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह्यानिशी प्रदेश कार्यालयाकडे रवाना करण्याचे ठरविण्यात आले . यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नेते नंदकुमार शेठ घाटे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब जिल्हा कोषाध्यक्ष अभय बापट जिल्हा कार्यकारी सदस्य निलेश पेडणेकर, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव ,उपाध्यक्ष शामकांत शेडगे उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर सरचिटणीस शरद शिंदे शहराध्यक्ष विजय उर्फ बंटी कदम तालुका कार्यकारी सदस्य वसंत मोहिते, नागेश आचरेकर,, ,विश्वनाथ तेली, महिला तालुकाध्यक्ष नयना आचरेकर,, जिल्हा कार्यकारी सदस्य रसिका पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष अजय नाणेरकर युवक तालुका अध्यक्ष विनायक जोईल तालुका कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण कदम, जयराम कदम ,सुमंत वाडेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page