राष्ट्रवादीच्या नंदू घाटे यांनी केला सत्कार
: देवगड
कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसा.चेअरमनपदी निलेश पेडणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे,: कुणकेश्वर सोसायटीच्या चेअरमन कै मीना बोडाळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाकरिता ही निवडणूक पार पडली .निलेश पेडणेकर यांची सर्वानुमते करण्यात आली या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस देवगड तालुक्याचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला .
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नेते नंदकुमार शेठ घाटे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब जिल्हा कोषाध्यक्ष अभय बापट जिल्हा कार्यकारी सदस्य निलेश पेडणेकर, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव ,उपाध्यक्ष शामकांत शेडगे उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर सरचिटणीस शरद शिंदे शहराध्यक्ष विजय उर्फ बंटी कदम तालुका कार्यकारी सदस्य वसंत मोहिते, नागेश आचरेकर,, ,विश्वनाथ तेली, महिला तालुकाध्यक्ष नयना आचरेकर,, जिल्हा कार्यकारी सदस्य रसिका पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष अजय नाणेरकर युवक तालुका अध्यक्ष विनायक जोईल तालुका कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण कदम, जयराम कदम ,सुमंत वाडेकर उपस्थित होते.
