बांदा/प्रतिनिधी
खरीब हंगामाची ई पीक पाहणी सुरु झाली असल्याने भात पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी याबाबत तलाठी कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शासनाच्या विविध योजनाची माहिती व लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करणे हे आवश्यक आहे. याबाबत शेतकऱ्यांत जागृती व्हावी यासाठी तलाठी श्रीमती नाडकर्णी यांनी शेतकऱ्यांना ई पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
बांद्यात ई पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
