*💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोनामुळे जगभराचा अर्थसंकल्प ढासळला असताना नरेंद्र मोदींनी जो देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे, त्यामुळे आज जगरभरातून मोदी सरकारचे कौतुक होत आहे. एक रूपायची वाढ न करता यात वेगळ्या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, शहरध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर ,नगरसेवक आनंद नेवगी, सरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, देशाचा अर्थसंकल्प काय आहे तसेच पक्षाने मला सिंधुदुर्ग जिल्हाला अर्थसंकल्प मांडण्यासाठी जबाबदारी दिली असे सांगत कोरोनच्या काळात मोदी सरकारने आत्मनिरभर योजना आणली यातून सर्व वस्तू भारतात बनवल्या जातात. या आत्म निर्भर पॅकेज मधून युवकांना रोजगारची संधी देखील उपलब्ध होईल, असेही कदम यांनी सांगितले.
जगभराचा अर्थसंकल्प ढासळला असताना नरेंद्र मोदींनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे जगभरातून कौतुक : राम कदम…
