*💫आंबोली दि.२८ विष्णू चव्हाण-:* आंबोली येथे मुत्युजंय दुत समितीची स्थापना करण्यात आली. वाढत्या अपघाताला आळा बसावा आणि तात्काळ अपघातग्रस्तांना प्राथमिक ऊपचाराची गरज लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला मदत म्हणून हि समिती स्थापन करण्यात आली आहे आहे. आंबोली हद्दीतील अपघाताची बातमी वाहतूक पोलिसांना कळवावी तसेच मदतीसाठी तात्काळ हजर होणे जेणेकरुन कुणाचे तरी जीव वाचतील, या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आंबोली येथे मुत्युजंय दुत समितीची स्थापना….
