ते काम तात्काळ रद्द न केल्यास उपोषण

*कोलझर गावातील हरीजन वस्तीतील ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाद्वारे इशारा

*💫सावंतवाडी दि.२८-:* विशेष घटक योजनेखाली मंजूर झालेले काम त्या ग्रामपंचायतीतील दलित वस्ती ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने ते काम तातडीने आदेश देऊन थांबवण्यात यावे अशी मागणी गाव मौजे कोलझर, शिरवल, उगाडे हरिजन वाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विशेष घटक योजनेअंतर्गत कोलझर ग्रामपंचायत हद्दीत बोंद्रे बंधारा काम करत आहेत. परंतु हा निधी फक्त दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च करता येतो. परंतु तरीही ही ग्रामपंचायत हा निधी दलित वस्ती ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी वापरत असून, याचा फायदा दलित वस्तीस नसल्याने हे काम तात्काळ रद्द करण्यात यावे. हे काम तत्काळ रद्द न झाल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता याना दिला आहे. यावेळी अर्जुन कासकर, वासुदेव कासकर, शांताराम कासकर, नितीन कासकर, सरस्वती कासकर, निशा कासकर, स्नेहलता कासकर, भिवा शिरवलकर, भाग्यश्री शिरवलकर, पुंडलिक जाधव, विशाखा म्हापणकर, श्रीदेवी कासकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page