बबन गावडे,अनिल चव्हाण: आरोग्य केंद्रात गोळ्याभावी रुग्णांची हेळसांड…
आंबोली,ता.४: जिल्हा आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा तुटवडा आहे.प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ गोळ्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.असे आवाहन आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कुचकामी ठरत आहे.आरोग्य विभागाकडे जिल्ह्यात सध्या औषध गोळ्या नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राना पुरवठा होत नाही.जिल्ह्याच्या ठिकाणीच पुरवठा होत नसल्याने आरोग्य केंद्राना पुरवठा होत नसल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्यांचा पुरवठा होत नाही.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे.
सध्या प्रशासक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे.राज्याच्या आरोग्य खात्याकडून पुरवठा होत नसेल तर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन निधी किंवा नियोजन मधून किंवा अन्य निधीतून तात्काळ औषध गोळ्यांची खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्राना पुरवणे आवश्यक आहे. सध्या अनेक मधुमेह(शुगर) ब्लड प्रेशर च्या रुग्णांना आरोग्य केंद्रातीलच गोळ्या चालतात इतर मेडिकल च्या गोळ्या चालत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. आंबोली आरोग्य केंद्रातील अनेक रिक्त पदे आहेत त्या परिस्थितीत येथील आरोग्य केंद्रातून २४ तास सेवा देण्याचा प्रयत्न आहे.पावसाळ्यातील धुके,अतिपाऊस,थंडी,अपघात, हजारो पर्यटक याठिकाणी येतात,भोगोलिक परिस्थिती या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून आंबोली कडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक असते.येथील आरोग्य केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक सुजित नायर यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन औषधसाठा पुरवणे आवश्यक आहे.पालकमंत्र्यांनी देखील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी बबन गावडे आणि अनिल चव्हाण यांनी केली आहे.
