*सावंतवाडी : दि.२६ :* सावंतवाडी शहरात आज स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेतर्फे मोती तलावाकाठी व रामेश्वर प्लाझा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. सकाळी ७.३०ते ९.३० या कालावधीत मोती तलाव सभोवतालच्या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, दिपाली भालेकर, सुरेंद्र बांदेकर, सुनील राऊळ, रविंद्र मडगावकर, विनोद सावंत, पालिकेच्या रसिका नाडकर्णी, दिलीप म्हापसेकर, श्री. सावंत, श्री. आडारकर आदी पालिका कर्मचारी या अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न
