वयोवृद्ध, आजारी कार्डधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करा….

मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाहण व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी केली तहसीलदारांकडे मागणी

*💫मालवण दि.२७-:* वयोवृद्ध, आजारी कार्डधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याची मागणी, मालवणातील मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाहण व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे सध्या रेशन दुकानावर ऑनलाईन धान्य वितरण करण्याच्या सूचना व्हॉटस् अॅपवर मिळाल्या आहेत. असे धान्य दुकानदारांकडून सांगण्यात येते. मात्र, याबाबतचे लेखी परिपत्रक आपल्याकडे नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे कार्डधारक व धान्य दुकानदार यांच्यात वाद होतात. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वारंवार रेशनिंग दुकानावर फेया मारणे आणि वयोवृद्ध, आजारी कार्डधारकांना अगर कुटुंबातील व्यक्तींना रेशनिंग दुकानावर जाणे धोक्याचे आहे. जेणेकरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीला आळा घालण्यासाठी मदत होईल. ही गंभीर बाब लक्षात घेऊन धान्य दुकानदारांना तशा लेखी सूचना देऊन ऑफलाईन धान्य वितरण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page