मराठी भाषेच्या प्रसाराला ग्रंथालयांचे योगदान महत्त्वाचे-: आमदार उदय सामंत….

*💫ओरोस दि.२७-:* २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी वि .वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होत आहे यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून तर मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव संजय वालावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी कुसुमाग्रज व संत रोहिदास याच्या फोटो ला पुष्प हार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यानी घातला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिप सदस्य नागेंद्र परब, माजी जिप सदस्य जान्हवी सावंत जि प वित्त अधिकारी मदन भिसे, प्राधिकरण सदस्य छोटू उर्फ महेश पारकर ,पत्रकार संजय वालावलकर ,रवि गावडे ,गुरु दळवी, ग्रंथालयाचे नियमित वाचक सभासद उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले . यावेळी मराठी भाषा ही राजभाषा आहे, या भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्या चे महत्त्वाचे कार्य ग्रंथालयाचे कार्यालय मार्फत केले जाते अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम नियमित व मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले .यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी अशी ग्रंथ प्रदर्शने सतत आयोजित करण्यात यावीत असे मनोगत व्यक्त केले .माजी जि प सदस्य व ग्रंथालयाच्या नियमित सभासद श्रीमती जान्हवी सावंत यांनी जिल्हा ग्रंथालयासाठी स्वतंत्र जागा मिळणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले . या कार्यक्रमाच्या वेळी कुसुमाग्रज संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्रीमती प्रतिभा ताटे तांत्रिक सहाय्यक याने मानले.(सोबत फोटो )

You cannot copy content of this page