अखेर मळगाव हायस्कूल समोर गतिरोधक…

मनसेने वेधले होते लक्ष; बांधकामाचे मानले आभार

⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूलच्या समोर गतिरोधक घातले नसल्याकारणाने हायस्कूलचे समोर अपघाताचे प्रमाण वाढले होते बऱ्याच जणांनी गतिरोधक घालण्याच्या या मागणीला जोर धरला होता ही बाब मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ, राकेश परब व कार्यकर्त्यांच्या गावातल्या लोकांनी आणि शिक्षक वर्गाने निदर्शनास आणून दिले त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देऊन गतिरोधक घालण्यास सांगितले तसेच बांधकाम विभागाने सहकार्य करून दुसऱ्या दिवशी हायस्कूलच्या समोर गतिरोधक घालून दिले त्यावेळी समोर उभे राहून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव हायस्कूलचे चेअरमन मनोहर राऊळ आणि गावातील लोकांनी भर पावसात गतिरोधक हव्या त्या जागेवर व्यवस्थित बसवून घेतले आणि हे गतिरोधक लवकरात लवकर घालून घेतल्यामुळे गावातील ग्रामस्थ हायस्कूल कमिटी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी मानले मनसे कार्यकर्त्यांचे आभार.

You cannot copy content of this page