कणकवली महाविद्यालयात
1 जुलै रोजी युवा महोत्सव कार्यशाळा

⚡कणकवली ता.२४-: मुंबई विद्यापीठच्या युवा महोत्सव 2023-24 अंतर्गत सिंधुदुर्ग विभागातील महाविद्यालयाकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 1 जुलै 2023 रोजी कणकवली काॅलेज, कणकवली येथे केले असून,

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक
म्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डाॅ. निलेश सावे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डाॅ. आशिष नाईक, सहाय्यक समन्वयक प्रा. नितीन वळंजू व मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागातील कलाकार मंडळी उपस्थित रहाणार आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य युवराज महालिंगे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page