अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला पादचारी गंभीर जखमी…

वेताळ – बांबर्डे येथील घटना; कार चालकाच पलायन

⚡कुडाळ ता.२४-: महामार्गावर वेताळ बांबर्डे तेलीवाडी येथे काल, शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सदर महिला कुडाळच्या दिशेने चालत जात होती. त्यावेळी कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने तिला धडक दिली. यात त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, यावेळी वाहनचालकाने पलायन केले.

स्थानिक नागरिक दिनेश शिरवलकर, विराज शिरवलकर यांनी पोलिस यंत्रणा तसेच रुग्णवाहिका बोलवून महिलेला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे पाठविले. मात्र, या घटनेतील जखमी झालेल्या महिलेची माहिती समजू शकलेली नाही.

You cannot copy content of this page