⚡मालवण ता.२०-:
जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी अक्षर लेखनाच्या माध्यमातून शाळेच्या मैदानावर WORLD YOGA DAY ही अक्षरे साकारत योग दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे कलाशिक्षक समीर चांदरकर व भूषण गावडे यांच्या संकल्पनेतून ही अक्षर कलाकृती साकारण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर, रामकृष्ण सावंत, किसन हडलगेकर , महेश भाट, इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
