कणकवली महाविद्यालयामध्ये कै. केशवराव राणे यांचा स्मृतीदिन कार्यक्रम

⚡कणकवली ता.१९-: शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन , शिक्षण महर्षि कै. केशवरावजी राणेसाहेब यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार २० जून रोजी सकाळ ९ वाजता येथील एचपीसीएल सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रमोद जमदाडे यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि वर्तमान स्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

अभिवादन व व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page