⚡सावंतवाडी ता.१९-: येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे जिल्हा सायबर शाखेत बदली झाल्यानंतर या ठिकाणी तात्पुरता चार्ज असलेले दोडामार्ग पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे आज भाजप सावंतवाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी नगरसेवक नासिर शेख, युवक शहराध्यक्ष देवा टेमकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, विनोद सावंत, महेश पांचाळ केतन आजगावकर हेमंत बांदेकर,अनिल सावंत,समीर पालव आदी उपस्थित होते.
